Feel Good Moments

Feelgoodmoments offers inspiring blogs in English and Marathi about mindset, law of attraction, life purpose, manifestation, and human behavior. Explore unique, self-photographed products like tote bags, pillow covers, and coasters alongside empowering online reading materials.

Sharing the learnings from the book ‘The Monk Who Sold His Ferrati’

  1. The Turning Point

आपल्याही आयुष्यात बरेच ‘Turning points’ येतात.
कितीतरी नवीन गोष्टी करण्याचा, सवयी लावून घेण्याचा, काहीतरी नवीन सुरु करण्याचा विचार नेहमी करत असतो. पण मुहूर्त मात्र काही केल्या लागत नाही. आणि अचानक एक दिवस असं काही घडतं की तो एक क्षण आपल्याला खडबडून जागं करतो आणि मग खऱ्या अर्थाने ‘मुहूर्त’ लागतो, लागतो म्हणण्यापेक्षा लावावाच लागतो.

यावरून एक धडा घेता येतो की आपल्या बाबतीत जे काही घडत असतं त्या प्रत्येक घटनेमागे काही ना काही ‘अर्थ’ असतो. आणि तो अर्थ आपल्याला आपल्या स्वप्नांच्या दिशेनेच घेऊन जात असतो. तो संकेत समजून त्यापुढे योग्य ते पाऊल उचलणं हे आपल्याला हातात असतं.

तुमच्या आयुष्यात असे काही Turning points आलेत का? तुम्ही त्यावेळी स्वतःमध्ये काही बदल केलात का?

कारण एकच लक्षात ठेवा

‘Every event has a Purpose & every setback has a Reason.’

  1. I feel others need to know what I know

अंदाजे 3 वर्ष हिमालयच्या सानिध्यात साधूंबरोबर घालवून स्वतःमध्ये हळू हळू होत गेलेला अमूलाग्र बदल आणि प्रसन्न झालेलं मन घेऊन जुलियन त्याच्या शहरांत त्याच्या खास मित्राला न सांगता भेट द्यायला जातो. आपल्याला काहीही न सांगता सुरकुतलेला सतत गंभीर असणारा चेहरा घेऊन निघून गेलेला साधारण पन्नाशीचा मित्र जेव्हा तरुण हसरा चेहरा घेऊन अचानक समोर येतो तेव्हा मित्राचा विश्वासच बसत नाही.

मित्राची ही स्थिती समजून घेत जुलियन त्याच्या मित्राला हळू हळू एकेक घडत गेलेली गोष्ट आणि आयुष्याचा समजलेला उद्देश त्याला सांगत जातो. उद्देश एकच. आपण अनुभवलेली मानसिक शांतता आपल्या मित्रानेही मिळवावी.

आजकाल सतत स्वतःची प्रगती आणि भयंकर अशा so called स्पर्धात्मक जगात वावरताना आपण इतरांसाठी आपुलकीने आणि निरापेक्षपणे खरच काही करतो का? असं म्हणतात की ज्ञान दिल्याने वाढतं. आपण बरेचदा दुसरे आपल्या पुढे जातील या भीतीने ही गोष्ट करायचं टाळतो. मान्य करायला कठीण असलं तरी हे खरं आहे.

यापुढे तुम्हाला असलेलं कोणत्याही विषयातलं ज्ञान इच्छा असेल त्या व्यक्तीला सांगायला विसरू नका. कारण आपण केलेलं पुण्य आपल्याकडे कोणत्या ना कोणत्या रूपात नक्कीच परत येतं.

  1. The power of Silence and stillness

समुद्राच्या खळखळणाऱ्या पाण्यात वाकून बघितल्यावर खळखळणाऱ्या पाण्याशिवाय काहीच दिसत नाही. पण शांत असलेल्या तळ्यात वाकून बघितलंत तर प्रतिबिंब अगदी स्पष्ट दिसतं.

आपलंही मनही तसंच आहे. आजूबाजूला सतत असलेल्या गोंगाटात आपल्याला कधी स्वतःचं नीट ऐकूच येत नाही. आयुष्यात शांतता, एकांत थोडा हवाच. अगदी दिवसातली काहीच मिनटं आपण स्वतःसाठी नक्कीच देऊ शकतो आणि तो वेळ काढणं हे फक्त आपल्याच हातात असतं.

शांत राहून स्वतःच्या विचारांकडे लक्ष दिल्यामुळे निर्णय घ्यायला मदत होते. स्वतःलाच अनेक गोष्टी स्पष्ट होतात. करत नसाल तर करून बघा. स्वतःला आहे तसं स्वीकारलं की त्यात चांगला बदल घडवता येतो. त्यासाठी स्वतःला आहे तसं मान्य करणं हे खुप महत्वाचं असतं. यात कुठलाही कमीपणा नसतो. उलट हे स्वतःशी मान्य करायला धाडस लागतं.

जुलियन मध्ये झालेल्या अमूलाग्र बदलात त्याला मिळालेली शांतता खुप महत्वाची आहे. यावरून समजतं की आपल्याला बदलायचं असेल तर आपण काहीतरी वेगळं हे करावंच लागतं. बदल हे आधी मान्य करावे लागतात. कारण एकसारख्याच असलेल्या परिस्थितीत राहून आपण कधीच बदलू नाही शकत.

Posted in ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *