Feel Good Moments

Feelgoodmoments offers inspiring blogs in English and Marathi about mindset, law of attraction, life purpose, manifestation, and human behavior. Explore unique, self-photographed products like tote bags, pillow covers, and coasters alongside empowering online reading materials.

‘श्री’ म्हणजे सामर्थ्य, श्री म्हणजे सौंदर्य, श्री म्हणजे अगणित संपत्ती, श्री म्हणजे अशरण बुद्धी. असे ‘श्री’ चे अनेकानेक अर्थ आहेत. अमाप यश असाही एक अर्थ आहे.  अनेकानेक सद्गुणांची अमाप यशदायी संपत्ती या वसुदेवपुत्र, यौवनश्रीमंत कृष्णाठायी एकवटलेली तुम्हा सर्वांना स्पष्ट दिसत नाही काय? मला तर ती स्पष्ट दिसते आहे. 

        याचा हा नाना व्यायामांनी घोटीव झालेला सुघड, नीलदेह बघतच राहावा असं नाही काय वाटत तुम्हाला? याच्या ‘शतकोटीसूर्यप्रभसम’ चर्येवरु उधळलेल्या तेजावर आज तुमची दृष्टी तरी ठरते काय? याच्या मुकुटातील मोरपिसाचा एकतरी वर्ण म्हणूनच आयुष्यभर राहावं असं तुम्हा पैकी प्रत्येकाला अजूनही स्पर्शून गेलं नाही काय? सांगा याच्या भ्रृंगवर्णी काळ्याशार अथांग नेत्रांचा अंत तुम्हाला कधीतरी लागू शकेल काय?    

– युगंधर  

माझी आत्तापर्यंत वाचलेली सगळ्यात लाडकी कादंबरी कोणती असेल तर ती ‘युगंधर’.  आणि त्यामधला हा अतिशय लाडका भाग. कितीही वेळा नजरेखालून गेला तरी समाधान काही होत नाही.  

कधी कधी काही गोष्टी आपल्या आयुष्याचा नकळतपणे भाग असतात पण आपल्या लक्षातही येत नाही. (किंवा योग्य वेळ आली की लक्षात येतात) माझंही तसंच काहीसं झालं होतं जेव्हा मी ‘युगंधर’ पहिल्यांदा वाचलं. वाचलं म्हणण्यापेक्षा ‘अनुभवलं’ जास्त योग्य ठरेल. कारण युगंधर आहेच असं. 

शिक्षण संपून नोकरीत पदार्पण केल्यापासून मी गमतीत अनेकदा म्हणायचे की 2 – 3 महिने नुसतं वाचायला मिळायला हवेत. दुसरं काहीच नको. कुठलीच commitment नको. आणि बघा वास्तू कशी तथास्तु म्हणत असते. Covid काळात खरंच तसे दिवस मिळाले. Lockdown आणि त्याचदरम्यान नोकरीत केलेला बदल या एकत्रित गोष्टींमुळे खरंच 2 महिने हवं ते करायला मिळाले. No office चं काम. आणि No any commitments.  मग तासन तास वाचून काढायचे. 

तेव्हाच युगंधर वाचण्याचा योग आला. आणि तेव्हापासून श्रीकृष्णविषयी एक वेगळंच Connection जाणवायला लागलं. श्रीकृष्णाच्या व्यक्तिमत्वातले वेगवेगळे पैलू वाचता वाचता डोळ्यात पाणी यायचं. एवढं दयाळू, एवढं निरागस, एवढं मनकव्हडं आणि तरीही एवढं चतुर आणि कठोर कोणीही कसं बरं असू शकतं?

आत्तापर्यंत अनेक पुस्तकं आणि काही कादंबऱ्या वाचल्या पण ‘युगंधर’ मनात कोरलं गेलंय एवढं मात्र नक्की. युगंधर म्हणजेच श्रीकृष्ण आणि श्रीकृष्ण म्हणजेच युगंधर. 

वाचून झाल्यानंतर कितीतरी दिवस मी त्याच धुंदीत होते. ही कादंबरी आपलीच कोणीतरी आहे असं वाटायला लागलं. त्यानंतर नकळत कृष्ण तर पहिल्यापासून माझ्या सोबतच आहे असं वाटायला लागलं. हे वाटण्याला कारणही तसंच आहे. सांगते.  

लहानपणापासून मी रहात असेलेल्या इमारतीच नाव होतं ‘सुदामा नंदन’.  कॉलेज मध्ये असताना आम्ही नवीन घरात शिफ्ट झालो. त्या घराच्या खिडकीतून समोरच्या इमारतीवर लिहिलेलं नाव दिसायचं आणि ते नावं म्हणजे नाव ‘कृष्ण सुदामा’. आणि खरी गंमत म्हणजे  लग्न होऊन सासरी गेले. तर सासरच्या इमारतीचं नाव ‘राधा’. आता ह्याला फक्त योगायोग कसा बरं म्हणायचा  सांगा. 

आणखीही बरेच अनुभव आहेत. सासरच्या गावाला कुलदेवीच्या मंदिरामध्ये दरवर्षी कृष्ण जन्माष्टमी अगदी परंपारिक पद्धतीने जोरदार साजरी केली जाते. आता दरवर्षी त्याचा अनुभव घेण्याचं भाग्य वाट्याला येतंय. पहिल्याच वर्षी गेले आणि तो सोहळा पाहून भारावून गेले. श्रीकृष्णासाठी सजावलेला झोपाळा, कृष्णजन्माची कीर्तनस्वरूपी कहाणी, रात्री 12 नंतर फुले उधळून साजरा करण्यात येणारा जन्मसोहळा, दुसऱ्या दिवशीचं काल्याचं कीर्तन, लोण्यात माखून खेळलेली दहीहंडी,  कृष्णाबाप्पाच्या भोवती धरलेला फेर आणि सोबतीला गजर, हे सगळं अनुभवून भारावून जायला झालं. आणि आता दरवर्षी या सणासाठी गावाला जायची आतुरता असते. 

यामध्ये ही एक जाणवलेली गोष्ट अशी की दरवर्षी कीर्तनाला आदरणीय कीर्तनकार कृष्ण जन्माची कहाणी सांगतात, कहाणी तर एकच, पण दरवर्षी त्याच एक वेगळंच रूप समोर येतं. एक वेगळाच दृष्टिकोन मिळतो. अगदी कीर्तनकार जरी कधी तेच असले तरीही बरं का. ‘सत्संग’ म्हणतात तो हाच. 

आता पुढचा किस्सा माझ्या पहिल्या solo विमानप्रवासाचा आहे. 2024 मध्ये ठरवल्याप्रमाणे solo marathon, solo movie aani solo hotelling करून झालं. पण अनेक महिने मनात असलेल्या solo tour चा मुहूर्त काही लागत नव्हता. 

Intuitions तुम्हाला तुमच्या मनातल्या इच्छा पूर्ण करायला कशी मदत करत बघा.  एका आवडत्या विषयाच्या workshop   ला गेलेले. मुंबईतच होता. खूप आवडला.  त्याचा advanced  part शिकायची खूप इच्छा झाली. त्यासाठी लागणारा वेळ आणि पैसा invest करताना थोडीशी धाकधूक वाटत होती.  पण, gut feeling सांगत होतं. जबरदस्त intuition होत होते आणि ते ऐकून मी शिकण्याचा निर्णय घेतला. 

Advanced  worshop Chennai ला असल्यामुळे या 

निमित्ताने चेन्नई ला जाण्याचा योग आला. अर्थातच 4 दिवसीय workshop असल्यामुळे घरातून मी एकटीच होते. आणि माझी पहिली solo tour सुरू झाली.  Educational solo tour. 

पहिल्यांदाच out of state प्रवास एकटीने करत होते त्यामुळे Excitement सोबत मनात थोडीशी काळजीही होती. विमानात बसले आणि प्रवासापूर्वीच्या announcements सुरू झाल्या. विमानचालकाने स्वतःची ओळख करून दिली. नाव –  ‘कृष्ण मूर्ती’. ऐकता क्षणीच कान टवकारले गेले आणि चेहर्‍यावर आपोआपच स्मितहास्य उमटलं. का ते फक्त मलाच कळलं होतं. आणि तिथेही माझी सोबत करणार्‍या हरीला. मग काय.. प्रवास आणि पहिली solo tour मस्तच व्हायची होती. 

भरजरी ग पीतांबर गाणं तुम्हाला माहित असेलच.. श्यामची आई सिनेमात हे गाणं परत घेतलं आहे. ते माझं अतिशय आवडतं गाणं. कधी काही कारणामुळे मूड गेला असेल तर हे गाणं मी ऐकते. एका जागी बसुन कानात हेडफोन्स घालून डोळे मिटून फक्तं एकदा जरी हे गाणं ऐकलं तर आईने येऊन मिठी मारल्याचं समाधान मिळतं आणि परत नवीन हुरूप येतो. 

श्रीकृष्णाची साथ नेहमीच असते. नामस्मरण आपोआपच होत असतं. कधी ऑफिस मध्ये असणार्‍या साथीदारांना हाक मारताना, तर कधी कुणाला पत्ता सांगताना. कधी मोबाईल मध्ये अचानक दिसणार्‍या पोस्ट वर तर कधी प्रवास करताना आजुबाजुला येणार्‍या गाण्यातून. 

शेवटी काय तर आपली भक्ती मनापासून खरी असेल तर ती त्याच्यापर्यंत पोहोचतेच. 🙏😇

Posted in

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *